पीएम्इंडिया
भारत आणि जर्मनी यांच्यात सुरक्षा सहकार्य विषयक सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावानं मान्यता देण्यात आली. या करारामुळे उभय देशातले संबंध अधिक दृढ होणार आहेत. या सामंजस्य करारामुळे माहिती, तज्ञांचा सल्ला, तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानाद्वारे या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता राखण्यासाठी मदत होणार आहे. तसेच दहशतवादाला आळा घालण्याबरोबरच, अंमली पदार्थांची तस्करी आणि सीमावर्ती भागातली गुन्हेगारी रोखण्यासाठीही, माहितीचे आदान-प्रदान उपयुक्त ठरणार आहे.
या सामंजस्य करारामुळे भारत आणि जर्मनी यांच्यात सुरक्षा विषयक सहकार्य आणि प्रभाव वाढण्याची अपेक्षा आहे.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre