Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि झाम्बिया यांच्यातील न्यायालयीन सहकार्य क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने भारत आणि झाम्बिया यांच्यातील न्यायालयीन सहकार्य क्षेत्रातील सामंजस्य करारावरील स्वाक्षरीला मंजुरी दिली आहे.

गेल्या काही वर्षात भारत आणि झाम्बिया यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध सकारात्मक दिशेने विकसित झाले आहेत. न्याय क्षेत्रातील सहकार्याबाबत करारावर स्वाक्षरी करण्यात आल्यामुळे उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील आणि न्यायालयीन सुधारणा क्षेत्राला नवीन आयाम मिळेल.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar