Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात भूविज्ञान, खाण आणि खनिज संपत्ती क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात भूविज्ञान, खाण आणि खनिज संपत्ती क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली. झिम्बाब्वेतील हरारे येथे ३ नोव्हेंबर २०१८रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

ठळक वैशिष्ट्ये

साधनसंपत्ती, कायदे आणि धोरणांच्या माहितीचे आदानप्रदान, विकासाच्या धोरणांवर विचार विनिमय करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन, उभय पक्षांमध्ये तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यास प्रोत्साहन देणे, मूल्यवर्धन वाढविणे आणि खाण क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधीना प्रोत्साहन देणे हा कराराचा उद्देश आहे. .

लाभ:

या करारामुळे निवडक क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध होईल.

B.Gokhale/S.Kane/P.Kor