पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि डेन्मार्क दरम्यान अन्न सुरक्षा सह्कार्यावरील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 16 एप्रिल 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
लाभ:
या करारामुळे द्विपक्षीय संबंध , परस्पर सामंजस्य आणि विश्वास अधिक दृढ व्हायला मदत होईल आणि अन्न सुरक्षेच्या दिशेने क्षमता निर्मितीला अधिक बळकटी येईल. तसेच उभय देशांमध्ये अन्न सुरक्षा क्षेत्रातील उत्तम पद्धती जाणून घेण्यास प्रोत्साहन मिळेल आणि अन्न सुरक्षेशी संबंधित समस्यांचे जलद गतीने निवारण करता येईल.
उत्तम पद्धतींचा अवलंब केल्यामुळे अन्न सुरक्षा मानकांत सुधारणा होण्यास मदत होईल तसेच महत्वाच्या वस्तूंचा व्यापार सुलभ होईल.
B.Gokhale/S.Kane/D.Rane