पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान दुहेरी कर आकारणी आणि करचुकवेगिरीसंबंधी दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठीच्या करारावर राजशिष्टाचाराअंतर्गत सुधारणा करण्याला मंजूरी देण्यात आली आहे.
हा करार बँक माहिती तसेच बिगर कर व्याज याविषयीच्या माहितीसह करविषयक प्रकरणातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीची आंतरराष्ट्रीय मानके या करारात उपलबध असतील. तुर्कमेनिस्ंतानमधील भारतीय रहिवाशांसंदर्भातील माहितीचे तुर्कमेनिस्तान आणि भारतीय कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये आदानप्रदान करण्याची या करारात तरतूद आहे.
राजशिष्टाचाराअंतर्गत या कराराचा दुरुपयोग टाळण्यासाठी लिमिटेशन ऑफ बेनिफिट कलमाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या कलमाअंतर्गत देशांतर्गत करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये या करारातील सध्या अस्तित्वात असलेल्या तरतूदींचा वापर होईल.
J.Patnakar/S.Tupe