पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि नायजेरिया दरम्यान सुधारित हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजूरी दिली आहे. यापूर्वीचा करार ३१ जानेवारी १९७८ रोजी करण्यात आला होता. नागरी उड्डाण क्षेत्रातील अलीकडच्या घडामोडी लक्षात घेऊन आणि उभय देशांदरम्यान हवाई संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या आराखड्यानुसार कराराचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.
भारत आणि नायजेरिया दरम्यान नागरी उड्डाण संबंधात सुधारित करार एक महत्वपूर्ण टप्पा असून,उभय देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धिंगत करण्याची त्यात क्षमता आहे.
हवाई सेवा कराराची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:-
१) दोन्ही देशांना एक किंवा त्यापेक्षा अधिक विमान कंपन्या नियुक्त करता येणार
२) दोन्ही देशांच्या नियुक्त विमान कंपन्यांना एकमेकांच्या प्रदेशात हवाई सेवेला प्रोत्साहन आणि विक्रीसाठी कार्यालय स्थापन करण्याचे अधिकार
३) एकमेकांच्या देशात कितीही माल-वाहतूक करायला उभय देशांची मान्यता
४) व्यावसायिक विचार करून किफायतशीर किमतीत सेवा पुरवण्याच्या करारानुसार प्रवास शुल्क ठरवण्याचा नियुक्त विमान कंपन्यांना अधिकार
५) प्रत्येक देशाच्या विमान कंपनीला त्याच देशाच्या किंवा अन्य देशाच्या कंपनीबरोबर सहकार्य विपणन व्यवस्था करता येणार.
एस. काणे / बी. गोखले