Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.16मे 2017 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धी,संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण आणि अटकाव,औषधे आणि वैद्यकीय उपकरणे,त्याचबरोबर परस्पर हिताचे आणखी विभाग या क्षेत्रांचा या सामंजस्य करारात समावेश आहे.

सहकार्याबाबतचे अधिक तपशील ठरवण्यासाठी एका कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार असून या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीकडेही हा गट लक्ष पुरवणार आहे.

N. Sapre/N.Chitale/Darshana