पीएम्इंडिया
भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात युवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.
दोन्ही देशात,कल्पना, मूल्ये आणि संस्कृतीचे आदान-प्रदान होण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे.उभय देशातले मैत्रीपूर्ण संबंध दृढ व्हायलाही यामुळे मदत होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha