पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि पोर्तुगाल यांच्या दरम्यानच्या झालेल्या सामंजस्य करारांना आज मंजुरी देण्यात आली. उभय देशांमध्ये कृषी आणि इतर विविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे करार झाले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान माहितीचे आदान प्रदान करणे, कृषी विषयक प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रांचे आयोजन करणे, तज्ञांशी चर्चा, विचार विनिमय करणे यासाठी उभय देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. भारत-पोतुर्गाल सामंजस्य करार पाच वर्षांसाठी करण्यात आला असून त्याचा कार्यकाल आणखी पाच वर्षे वाढवणेही शक्य होणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/P.Kor