Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि पोलंड दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सहकार्याबाबत करारावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि पोलंड दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सहकार्याबाबत करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे. कृषी क्षेत्रातील सद्यस्थितीबाबत माहितीची देवाणघेवाण, पिकांचे आरोग्य, हानिकारक किटाणू आणि प्राण्यांच्या संसर्गजन्य रोगांचे आव्हान यांसह कृषी आणि संलग्न क्षेत्रातील विविध बाबी या करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कृषी आणि कृषी-अन्न प्रक्रियेशी संबंधित मेळावे, प्रदर्शने, चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये सहभाग, उभय देशांमधील राज्यांदरम्यान शेतीमालाचा व्यापार आणि मदत यासह संयुक्त आर्थिक उपक्रम हाती घेणे आणि विकसित करणे यांचा देखील यात समावेश आहे.

दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या संयुक्त कृती गटाची स्थापना करण्याची तरतूद या करारात आहे. हा संयुक्त कृती गट सहकार्याच्या योजना तयार करेल तसेच कराराच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा शोधेल.

N.Sapre/S.Kane/D.Rane