Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि पोलंड यांच्यात नागरी हवाई वाहतूक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि पोलंड दरम्यान नागरी  हवाई वाहतूक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता  देण्यात आली. दोन्ही  देशाच्या सरकारांनी मान्यता दिल्यानंतर  या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. हा सामंजस्य करार पाच वर्षासाठी असेल. हवाई वाहतूक क्षेत्रात परस्पर लाभदायी सहकार्याला वाव देण्याबरोबरच भारतात प्रादेशिक हवाई वाहतूक सुधारण्याचा या करारामागचा उद्देश आहे.

 या करारा अंतर्गत,भारत आणि पोलंड यांच्यात नागरी  हवाई सहकार्यात, प्रतिकूल परिणाम करणाऱ्या विधी आणि प्रक्रियात्मक मुद्द्यांचा आढावा घेऊन नागरी हवाई बाजारपेठेत सहकार्य करणे, हवाई नियमन,हवाई वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी याकरिता सुरक्षा मानके यासंदर्भात दोन्ही देशांच्या संबंधित मंत्रालये आणि हवाई वाहतूक प्राधिकरणात माहितीची देवाणघेवाण,या क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar