Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फिलिपाईन्स दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फिलिपाईन्स दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

या सामंजस्य करारामुळे कृषी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य सुधारेल आणि उभय देशांना याचा लाभ होईल.

यामुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वोत्तम कृषी पद्धती समजून घ्यायला प्रोत्साहन मिळेल आणि उत्तम उत्पादकतेसह जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल.

तांदळाचे उत्पादन आणि प्रक्रिया, बहुधान्य प्रणाली, कोरड  जमीन शेती प्रणाली, जैव-सेंद्रिय शेती, जल संवर्धन आणि व्यवस्थापन, जमिनीचा कस, रेशीम किडे पालन, पशुधन सुधारणा आदी क्षेत्रात सहकार्याची तरतूद या सामंजस्य करारात आहे.

या सामंजस्य करारात समान प्रतिनिधींचा संयुक्त कृतीगट स्थापन करण्याची तरतूद आहे. या संयुक्त कृतीगटाची दर दोन वर्षांनी फिलिपाईन्स आणि भारतात आलटून पालटून बैठक होईल.

 

N.Sapre/S.Kane/D.Rane