Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फ्रान्स दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात तांत्रिक द्विपक्षीय सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फ्रान्स दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात तांत्रिक द्विपक्षीय सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. या करारावर 3 ऑक्टोबर 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

ठळक वैशिष्ट्ये :-

भारत आणि फ्रान्सचा उद्देश परस्पर लाभ, समानता आणि पारस्‍पारिकतेच्या आधारे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा संबंधित मुद्द्यांवर तांत्रिक द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्‍थागत संबंध सुनिश्चित करण्याचा आधार स्‍थापन करणे हा आहे. संशोधनाशी संबंधित संयुक्‍त कार्यदल, प्रायोगिक प्रकल्प, क्षमता निर्माण कार्यक्रम, अध्‍ययन भ्रमण (स्‍टडी टूर), केस स्‍टडी आणि अनुभव/नैपुण्य आदानप्रदान, तांत्रिक सहकार्याच्या कक्षेत येईल.

लाभ:-

या करारामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य वाढण्यात मदत मिळेल.

***

S.Tupe/S.Kane/P.Malandkar