Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फ्रान्स दरम्यान पर्यावरण क्षेत्रात सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फ्रान्स दरम्यान पर्यावरण क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

या करारामुळे दोन्ही देशांमध्ये पर्यावरण सुरक्षा क्षेत्रात आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन देण्यात मदत मिळेल. समानता , परस्पर सहकार्य आणि परस्पर लाभ लक्षात घेऊन दोन्ही देशांच्या कायदेशीर तरतुदीनुसार हे सहकार्य असेल.

या करारामुळे उत्तम पर्यावरण सुरक्षा, उत्तम संरक्षण, हवामान बदलाचे उत्तम व्यवस्थापन आणि वन्यजीव संरक्षणासाठी योग्य आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम पद्धती यांची मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

N.Sapre/S.Kane/D.Rane