Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फ्रान्स यांच्यात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि फ्रान्सचे त्याच पातळीचे नागरी हवाई प्राधिकरण यांच्यात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे अधिकाऱ्‍यांना त्यांचे कौशल्य व ज्ञान वाढवण्यासाठी हा सहकार्य कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. तसेच अभियंते, तंत्रज्ञ, व्यवस्थापक आदींना प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे.

N.Sapre/S.Patil/Anagha