Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फ्रान्स यांच्यातील रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेखाली मंत्रिमंडळाला भारतीय रेल्वे आणि फ्रान्सची एसएनसीएफ मोबिलिटीज कंपनी यांच्यातील रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. या करारावर 10 मार्च 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे भारतीय रेल्वेला रेल्वे क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि ज्ञान याबाबत माहितीचे आदान -प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून तांत्रिक ज्ञान, अहवाल आणि तांत्रिक कागदपत्रांचे आदान-प्रदान तसेच विशिष्ट तंत्रज्ञानावर केंद्रित प्रशिक्षण आणि चर्चासत्र/कार्यशाळा आयोजित करण्यास मदत मिळेल.

या करारांतर्गत पुढील प्रमुख क्षेत्रात सहकार्याची रूपरेखा ठरवण्यात आली आहे-

1. अति जलद आणि मध्यम अति-जलद रेल्वेसेवा

2. स्थानकाचे आधुनिकीकरण आणि परिचालन

3. विद्यमान परिचालन आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण

4. उपनगरी गाड्या

पार्श्वभूमी:

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्षेत्रात तांत्रिक सहकार्यासाठी विविध देशांचे सरकार आणि राष्ट्रीय रेल्वे बरोबर सामंजस्य करार केले आहेत. या अंतर्गत अतिजलद कॉरिडॉर, सध्याच्या मार्गांचा वेग वाढवणे, स्थानके जागतिक दर्जाची बनवणे, रेल्वे सुविधांचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे.

N.Sapre/S.Kane/D.Rane