Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या सागरी जागृतता अभियान सहकार्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेबाबत मंत्रिमंडळाला माहिती


भारत आणि फ्रान्स यांच्यात 10 मार्च 2018 रोजी स्वाक्षऱ्या झालेल्या मेरीटाईम डोमेन अवेअरनेस मिशन च्या स्थापनापूर्व अभ्यासासाठीच्या अंमलबजावणी व्यवस्थेबाबत केन्द्रीय मंत्री मंडळाला आज माहिती देण्यात आली.

सागरी अधिकार क्षेत्र जागरूकतेसाठी हे प्रस्तावित संयुक्त अभियान हाती घेण्यात आले असून दोन्ही देशांना उपयुक्त माहिती आणि सेवा पुरविण्याचा उद्देश आहे.सागरी वाहतुकीवर देखरेख ठेवण्याबरोबरच संदिग्ध जहाजे ओळखण्यासाठीही यामुळे मदत मिळणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्या हितासाठी संबंधित क्षेत्रात जहाजांवर देखरेख,ओळख याबाबत ही यंत्रणा उपाय पुरवणार आहे.

या स्थापना पूर्व अभ्यासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि फ्रान्सची सीएनईएस ही संस्था संयुक्तपणे विविध उपक्रम हाती घेणारआहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar