पीएम्इंडिया
भारत आणि बांगलादेश यांच्यात न्यायालयीन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांच्या न्यायव्यवस्थांमध्ये परस्पर सहकार्य विकसित करणे, चालना देणे व त्याला बळकटी देणे हा या कराराचा उद्देश आहे. दोन्ही देशांचे न्यायाधीश व न्यायव्यवस्थेमधील विविध पातळ्यांवरील अधिकारी यांना परस्परांच्या देशांना भेटी, प्रशिक्षण व शैक्षणिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दोन्ही देशांच्या तज्ज्ञांना माहितीची व ज्ञानाची देवाणघेवाण करता येणार आहे.
N.Sapre/S.Patil/Anagha