पीएम्इंडिया
भारत आणि बांगलादेश यांच्यातील किनारपट्टी व शिष्टाचार मार्गांवर प्रवासी क्रूझ सेवा सुरू करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रवासी आणि पर्यटक यांची नियमित जलवाहतूक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. हा सामंजस्य करार कार्यान्वित झाल्यावर दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढीला लागेल आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जवळीक निर्माण होऊन सहकार्य वृद्धिंगत होईल. तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांना रोजगारसंधीही उपलब्ध होतील.
N.Sapre/S.Patil/Anagha