पीएम्इंडिया
भारत आणि बांगलादेश यांच्यातील शिष्टाचार मार्गावर जमुना नदीचा सिराजगंज-दाईखावा व कुशियारा नदीच्या आशुगंज- झाकिगंज या पट्ट्यांमध्ये मुक्तमार्ग विकासासंदर्भातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी दोन्ही देशांच्या वतीने संयुक्तपणे खननकार्य केले जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे ईशान्य भारताकडे मालवाहतूक करण्यासाठी होणा-या खर्चात लक्षणीय कपात होणार आहे. तसेच सिलिगुडी चिकनच्या नेक मार्गिकेवरील ताणही कमी होणार आहे.
N.Sapre/S.Patil/Anagha