पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बेलारूस दरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करारावरील स्वाक्षरी आणि त्याचे पालन करायला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. या करारामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि त्यामुळे थेट परदेशी गुंतवणूक आणि परदेशातून थेट गुंतवणुकीच्या संधीत वाढ होईल आणि याचा रोजगार निर्मितीवर सकारात्मक परिणाम होईल.
बेलारूस यूरेशिअन आर्थिक महासंघाचा सदस्य असल्यामुळे उभय देशांमधील या करारावरील स्वाक्षरी आणि पुष्टी धोरणात्मक उपाययोजनेचे काम करेल. भारताने यापूर्वीच किरगिझ प्रजासत्ताक बरोबर द्विपक्षीय गुंतवणुकीच्या कराराच्या मसुद्याबाबत पुढाकार घेतला आहे आणि रशियाबरोबर नवीन कराराच्या मसुद्याबाबत चर्चा सुरु आहे.
N.Sapre/S.Kane/P.Kor