Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि ब्रुनेई दरुसालेम यांच्यात कर संकलन विषयक माहितीचे आदान प्रदान आणि सहाय्य याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या आणि मंजुरीला मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि ब्रुनेई दरुसालेम यांच्यात कर संकलन विषयक माहितीचे आदान प्रदान आणि सहाय्य याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला आणि या कराराच्या मंजुरीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

तपशील :

I. भारत आणि ब्रुनेई दरूसालेम यांना या करारात समविष्ट असलेल्या करांसंदर्भात, करविषयक देशांतर्गत कायद्याच्या अंमलबजावणीच्या सहाय्यासाठी सक्षम प्राधिकरणांना माहितीचे आदान-प्रदान करून सहाय्य करण्याची तरतूद या करारात आहे.

II. या करारा अंतर्गत मिळालेली माहिती गोपनीय राहील आणि केवळ कर मुल्याकन, कर संकलन, अंमलबजावणी आणि अपील यांच्याशी संबंधी व्यक्तींकडेच ही माहिती उघड करता येईल.

III. दोन्ही देशात कर महसूल संकलन दाव्यांविषयी सहाय्य करण्याची तरतूद या करारात आहे.

IV. कोणत्याही विवादास्पद मुद्याचे निराकरण करण्यासाठी परस्पर संमती प्रक्रियेची तरतूद यामध्ये आहे.

V. या करारामुळे माहिती देवाण घेवाण करण्याचा ओघ वाढून कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे.

VI. या करारात कुठल्याही आर्टिकल कराराची अंमलबजावणी नाही परंतु जर एखाद्या व्यवहाराचे मूल्य 500 अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाल्यास कराराच्या 9व्या आर्टिकलनुसार कर लागू होईल. हाच नियम भारत सरकारतर्फे कर माहिती देवाण घेवाण नियमांतर्गत तरतूदीद्वारे असेल.

पूर्वपीठीका :

प्राप्तीकर कायदा 1961 च्या कलम 90 नुसार, प्राप्ती कर कायद्या अंतर्गत देय, प्राप्ती कराची चुकवेगिरी टाळण्यासाठी कोणत्याही परकीय देशाशी अथवा विशिष्ट भागाशी करार करण्याचा सरकारला अधिकार आहे,त्यानुसार भारत सरकारने ब्रुनेई दरुसालेमशी हा करार केला आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane