Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मोझांबिक दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मोझांबिक दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.

सध्या भारत आणि मोझांबिक दरम्यान कोणताही हवाई सेवा करार नाही. दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क वाढवण्यासाठी हवाई सेवा कराराचा मसुदा निश्चित करण्यासाठी उभय देशांनी 2011 मध्ये सल्लामसलतीची प्रक्रिया सुरु केली होती.

अर्थ मंत्रालय (महसूल विभाग/आर्थिक व्यवहार विभाग), परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि कायदे आणि न्याय मंत्रालय (कायदा विभाग) यांच्याशी विचार विनिमय करुन हवाई सेवा कराराचा मसुदा निश्चित करण्यात आला आहे. कराराची प्रमुख वैशिष्टये पुढीलप्रमाणे :-

• प्रत्येक देशाच्या बहुनियुक्त विमान कंपन्या

• प्रत्येक देशाची नियुक्त विमान कंपनी त्याच देशाच्या अन्य देशांच्या नियुक्त कंपनीबरोबर सहकार्यात्मक विपणन व्यवस्थेत सहभागी होऊ शकते.

• उभय देशातील नियुक्त विमान कंपन्यांना परस्परांच्या प्रांतात विमानसेवांची जाहिरात आणि विक्री करण्यासाठी कार्यालये स्थापन करायला परवानगी.

• विशिष्ट मार्गांवर विमानसेवांच्या परिचालनाची दोन्ही देशातील नियुक्त विमानकंपन्यांना समान संधी मिळणार.

• याशिवाय, या हवाई सेवा करारामध्ये परिचालन परवानगी, व्यावसायिक संधी, सुरक्षेशी संबंधित कलमे रद्द करण्याची तरतूद देखील आहे.

S.Kane/B.Gokhale