Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मोरक्को यांच्यातल्या युवकांसंदर्भातल्या बाबीविषयी सहयोग करणाऱ्या सामंजस्य कराराची मंत्रिमंडळाला माहिती


भारत आणि मोरक्को यांच्यात फेब्रुवारी 2019 मधे युवकांविषयीच्या बाबीसंदर्भात झालेल्या सामंजस्य कराराची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत माहिती देण्यात आली.

माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण, कार्यक्रमातला सहभाग युवकांचे आदान-प्रदान याद्वारे उभय देशातले सहकार्य दृढ करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

युवा कार्यक्रमांचे आयोजन, आंतरराष्ट्रीय परिषद आणि चर्चासत्रांच्या निमंत्रणाची देवाणघेवाण, चित्रपट, संशोधन आणि इतर माहितीची देवाणघेवाण, युवा शिबिरे, युवा महोत्सव यामधे सहभाग या क्षेत्रात उभय देशात सहयोग करण्यात येणार आहे.

M.Chopade/N.Chitale/D. Rane