Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मोरोक्को यांच्यातल्या रेल्वे क्षेत्रातल्या सहकार्य करारालाकेंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


रेल्वे क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विभागात दीर्घ कालीन सहकार्य आणि भागीदारी विकसित करण्यासाठी भारत आणि मोरक्कन  नेशनल रेल्वे ऑफिस यांच्यातल्या सहकार्य कराराला,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.  14 डिसेंबर 2017 ला या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या सहकार्य करारामुळे या विभागात तांत्रिक सहकार्य शक्य होणार आहे –

प्रशिक्षण आणि कर्मचारी विकास

कर्मचारी आणि अनुभवाची देवाण घेवाण

तंत्रज्ञाचे आदान प्रदान यासह परस्पर तंत्र विषयक सहकार्य,

पूर्वपीठीका

रेल्वे क्षेत्रात तंत्र विषयक सहकार्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विविध परकीय देशांशी आणि राष्ट्रीय रेल्वेशी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अति जलद कॉरिडॉर, सध्याच्या मार्गांचा वेग वाढवणे,स्थानकांचा जागतिक दर्जाचा विकास,रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण या क्षेत्रात हे सहकार्य करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे रेल्वे क्षेत्रात, आधुनिक विकास आणि ज्ञानाची देवाण घेवाण यासाठी भारतीय रेल्वेला एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या सामंजस्य करारामुळे विशिष्ट तंत्रज्ञानावर आधारीत चर्चा सत्रे,कार्यशाळा आणि प्रशिक्षण, ज्ञानाची देवाण घेवाण करण्यासाठी इतर संपर्क आणि अहवाल तसेच तांत्रिक कागद पत्रांची देवाण घेवाण सुलभ होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar