Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मोरोक्को यांच्यातील कायदेविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कायदा क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी सहकार्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

या करारामुळे भारत आणि मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रे, कार्यशाळांमध्ये कायदेविषयक मुद्यांबाबत वकील, कायदा अधिकारी आणि विद्यार्थ्यांना चर्चा करायची संधी मिळेल.

N.Sapre/S.Kane/D.Rane