पीएम्इंडिया
भारत आणि युरोपियन संघादरम्यानच्या जल स्रोत क्षेत्रातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूरी दिली. हा करार समानता, परस्पर सहकार्य आणि परस्पर लाभाच्या आधारे जल व्यवस्थापन क्षेत्रात भारत आणि युरोपीयन संघाच्या तांत्रिक, वैज्ञानिक आणि व्यवस्थापकीय क्षमतांना बळकटी प्रदान करेल. जल मुद्यांवरील तांत्रिक मुद्यांचे आदान प्रदान देखील शक्य होईल.
कराराचा उद्देश मुख्य पर्यावरणविषयक मुद्दे शोधणे आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे जाणे हा आहे जिथे अनुभव व सहकार्याच्या आदान प्रदानामुळे जल व्यवस्थापन क्षेत्रातील भारत आणि युरोपियन संघातील सहकार्य विकसीत होऊन याचा लाभ दोघांना होईल. भारतातील वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि हवामान बदल यामुळे जल व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्याकरीता हा करार सहकार्य करेल जेणेकरुन भविष्यात भारतात अधिक शाश्वत जलस्रोत व्यवस्थापन कार्यरत होईल. सामंजस्य कराराच्या पूर्तीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर देखरेख ठेवण्याकरीता एक संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.
B.Gokhale/S.Mhatre/V.Deokar