पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यु.के.चे पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन हे आज यु.के. भारत सीईओ बैठकीला उपस्थित होते.
यु.के. चे पंतप्रधान कॅमरोन यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतामध्ये मोठया प्रमाणावर घडून येणाऱ्या बदलांसाठीचा दृष्टिकोन आणि निश्चिय विशद केला.
नरेंद्र मोदी यांनी भारत आणि यु.के. या दोन देशांच्या ऐतिहासिक आणि सदिच्छात्मक गठबंधनावर बोलतांना सांगितले की, दोन्ही देशांमधील संबंध वृध्दिंगत करायचे असल्यास आर्थिक बंधने हा खूपच महत्त्वाचा घटक ठरतो. त्यांनी सरकारने हाती घेतलेल्या “मेक इन इंडिया” तसेच विविध क्षेत्रात चालू करण्यात आलेली विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, पायाभूत सेवा आणि वर्ष 2022 पर्यंत 50 दशलक्ष नवीन घरे देण्याची वचनबध्दता तसेच 175 गिगावॅट्स नवीकरणीय ऊर्जा या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा दृष्टिकोन सांगितला. ते म्हणाले, भारतामध्ये ब्रिटीश कंपन्यांची गुंतवणूक ही दोन्ही देशांच्या भागीदारीसाठी विन-विन या तत्त्वावर राहील.
दोन्ही देशांच्या सीईओनी या बैठकीत सहभाग घेऊन वर्तमान संधीचे निरीक्षण केले.
B.Gokhale