पीएम्इंडिया
कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहाकर्यासाठी भारत आणि यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या कराराचा दोन्ही देशांना फायदा होणार आहे. दोन्ही देशातील सर्वोत्तम कृषी पध्दती समजायला प्रोत्साहन मिळेल आणि अधिक चांगले उत्पादन यायलाही यामुळे मदत मिळेल. कृषी तंत्रज्ञानातील सहकार्यामुळे अन्न सुरक्षेलाही अधिक बळकटी मिळेल.
B.Gokhale/S.Kulkarni/Anagha