पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि रशिया दरम्यान ऑक्टोबर 2016 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.
उभय देशांच्या वैज्ञानिक संघटनांदरम्यान संयुक्त वैज्ञानिक आणि संशोधन कार्याला सहकार्य करणे हा या कराराचा उद्देश आहे.
या करारांतर्गत उभय देश परिषद, मंच, प्रदर्शने, चर्चासत्र यामधील द्विपक्षीय हिताच्या माहितीचे आदान -प्रदान, करतील. तसेच वैज्ञानिक संघटना, वैज्ञानिक आणि तज्ञ यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करतील.
स्वाक्षरी केल्याच्या दिवसापासून हा करार अंमलात आला असून पाच वर्षांसाठी वैध असेल.
APS/S.Tupe/S.Kane/Anagha