Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि लाओ यांच्यातील हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि लाओ यांच्यातील नव्या हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक आदान-प्रदानात वाढ होईल अशी आशा आहे. तसेच जलद संपर्कासाठी पोषक वातावरण आणि दोन्ही देशांमधील विमान कंपन्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील.

या कराराअंतर्गत, दोन्ही देशांच्या नियुक्त विमान कंपन्यांना विशिष्ट मार्गांवर हवाई सेवेसाठी समान संधी मिळतील. मार्ग आणि वारंवारिता याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. दोन्ही देशांमधील कोणत्याही हवाई परिचालनासाठी हा करार मूलभूत कायदेशीर चौकट आहे.

BG/SK/AK