पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सायबर सुरक्षा क्षेत्रातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली. भारताच्या इंडियन कॉम्पुटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम आणि व्हिएतनामच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभाग यांच्यांतील या करारावर हनोई येथे ३ सप्टेंबर २०१६ रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सायबर सुरक्षा संबंधित घटनांचा शोध, त्यावर उपाययोजना आणि प्रतिबंध करण्यासाठी ज्ञान आणि अनुभवाचे आदान-प्रदान करण्यासाठी सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
या कराराच्या अंमलबजावणीमुळे व्हिएतनाममधील सायबर सुरक्षा क्षेत्रातील संस्थात्मक आणि क्षमता निर्मितीच्या माध्यमातून दोन्ही देशांना लक्षणीय लाभ होईल.
B.Gokhale/S.Kane/Anagha