Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय , सौदी अरेबियाचा पर्यटन आयोग आणि सौदी अरेबियाचा राष्ट्रीय वारसा यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

कराराची मुख्य उद्दिष्टे –

१. पर्यटन विकास, हॉटेल्स, रिसॉर्ट सुविधा, प्रदर्शन केंद्र, , कृषी पर्यटन , वाळवंट पर्यटन आदी क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान

२. पर्यटन गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून देणे

३. प्रदर्शने, परिषदांमध्ये सहभागी होणे.

N.Sapre/S.Kane/P.Kor