Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि स्वीडन दरम्यान रेल्वे क्षेत्रात तांत्रिक सहकार्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 15 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या भारत-स्वीडन रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्य परस्पर सामंजस्य कराराला मंजूरी देण्यात आली.

या परस्पर सामंजस्य करारामुळे खालील क्षेत्रात तांत्रिक सहकार्य प्रदान केले जाणार आहे.

1. रेल्वे धोरण विकास नियमन, संस्था दोन्ही देशांमधील वैशिष्टये

2. ज्ञानाची देवाण-घेवाण, तांत्रिक कौशल्य, नवीन उपक्रम, तंत्रज्ञान, शाश्वत उपाययोजना आणि संशोधन

3. शीत प्रदेशात मालवाहतूक, क्षमता निर्धारण (निश्चित वेळापत्रक) आणि कमाल देखभाल, सुधारित माल/संयुक्त वाहतूक

4. रेल्वे अभियंते आणि व्यवस्थापकांसाठी नियमित प्रशिक्षण आणि रेल्वेची विश्वसनियता व देखभाल यावर शिक्षण

S.Thakur/S.Tupe/M.Desai