पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि हेलेनिक यांच्यातील नवीकरणीय ऊर्जा सहकार्य कराराबाबत अवगत करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि नोव्हेंबर 2017 मध्ये नवी दिल्लीत आलेले हेलेनिकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री निकोस कोटझीयस यांनी त्यावेळी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
परस्पर लाभानुसार नवीन आणि नवीकरणीय मुद्यांवर तांत्रिक द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थात्मक संबंध स्थापित करणे हा दोन्ही देशांचा उद्देश आहे.
सहकार्याच्या क्षेत्रांबाबत आढावा, देखरेख आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी एक संयुक्त कृती गट स्थापन करण्याची तरतूद या सामंजस्य करारात आहे. अनुभव आणि माहितीच्या जाळ्याचे आदान प्रदान करणे हा कराराचा उद्देश आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane