Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आपली मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा राष्ट्रकुल समुदायासोबत सामायिक करण्यास सज्ज आहे, यावर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला. या लेखात भारत आपली मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा राष्ट्रकुल समुदायासोबत सामायिक करण्यास कसा सज्ज आहे,  यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

भारतामध्‍ये  राष्ट्रकुल देशांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचे (सीएसपीओसी) आयोजन केले जात  असताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’– म्हणजेच “संपूर्ण जग एक कुटुंब आहे.” या कालातीत मूल्याविषयी देशाच्या वचनबद्धतेवर भर दिला.  

एक्स या समाज माध्यमावरील लोकसभा सचिवालयाच्या हँडलच्या एका पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधान कार्यालयाच्या  हँडलने म्हटले आहे:

“भारत 28व्या ‘सीएसपीओसी’चे आयोजन करत असताना, माननीय @loksabhaspeaker  @ombirlakota यांनी यावर भर दिला आहे की, वसुधैव कुटुंबकमच्या भावनेने, देश आपली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा राष्ट्रकुलसोबत सामायिक करण्यास सज्ज आहे.

भारत तंत्रज्ञानाकडे कोणतीही खाजगी मालमत्ता म्हणून पाहत नाही, तर एक सार्वजनिक संपत्ती म्हणून पाहतो. या संपत्तीमुळे  जगभरातील लोकशाहीला  स्थैर्य प्राप्त होईल, असेही त्यांनी लिहिले आहे. 

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai