पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि केनिया यांच्या दरम्यान झालेल्या कृषी आणि इतर विषयीच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.
भारत आणि केनिया यांच्या दरम्यान कृषी संशोधन, पशूसंवर्धन, दुग्ध, मत्स्य, फळबाग, नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, हंगामानंतर आलेल्या पिकांचे व्यवस्थापन आाणि विपणन, मृदा संवर्धन, जल व्यवस्थापन, कृषी सिंचन प्रणाली, विकास आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, एकात्मिक कीड नियंत्रण, कृषी रोपे, यंत्रसामुग्री अशा कृषी क्षेत्रांशी निगडीत सहकार्य करण्याचा करार करण्यात आला आहे.
या करारानुसार उभय देशांमध्ये संयुक्त कार्यकारी समुहाची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. सहकार्याच्या कार्यक्रमाची कशा पध्दतीने अंमलबजावणी होत आहे, याचे निरीक्षण ही संयुक्त समिती करणार आहे.
भारत केनिया यांच्या दरम्यान पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला असून त्याची कार्यकाल आणखी पाच वाढवता येणार आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor