पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज भारत आणि कॅनडा दरम्यानच्या करार नूतनीकरणाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी देण्यात आली. एक एप्रिल 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीसाठी कराराचे नूतनीकरण करण्यात आले होते. 1968 साली भारताने शास्त्री-इंडो-कॅनेडियन संस्थेसोबत हा करार केला होता.
या करारामुळे, शास्त्री संशोधन संस्थेत विविध संशोधन कार्ये करता येणार आहेत. त्याशिवाय, निवासी-व्याख्याते अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम, वाचनालय अभ्यासक्रम, माहिती आणि सुविधा सेवा अशा विविध सेवा कार्यान्वित होतील.
R.Aghor/B.Gokhale