Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत छोडो आंदोलनातील सहभागी झालेल्या सर्व महिला आणि पुरुषांना वंदन, वर्ष 2020 पर्यंत “नवीन भारत” निर्माण करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्याचे जनतेला आवाहन


भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदन केले आहे. 2022 सालापर्यंत “नवीन भारत” निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेला प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाच्या पंचाहत्तरीनिमित्त या आंदोलनात सहभागी झालेल्‍या सर्व महान महिला आणि पुरुषांनो आम्ही तुम्हाला अभिवादन करतो.

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने संपूर्ण देश एकत्र आला.

1942 मध्ये, वसाहतवादापासून भारताला मुक्त करणे ही काळाची गरज होती. आज 75 वर्षांनंतर समस्या वेगळया आहेत. भारताला गरीबी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातवाद, जातीयवादापासून मुक्त करण्याची आणि 2022 पर्यंत आपल्या स्वप्नातील “नवीन भारत” निर्माण करण्याची आपण सर्व प्रतिज्ञा करुया.

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिमान वाटेल असा भारत निर्माण करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करुया. #SankalpSeSiddhi”

B.Gokhale/S.Kane/Anagha