पीएम्इंडिया
भारत आणि जॉर्डन यांच्यात माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी ऑक्टोबर 2015 मध्ये करण्यात आलेल्या कराराची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उभय देशात औद्योगिक, तांत्रिक आणि वाणिज्यिक सहकार्य अधिक दृढ व्हायला हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे.
या क्षेत्रात प्रामुख्याने खालील बाबीत सहकार्य करण्यात येईल-
1. जॉर्डनच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विशिष्ट गरजा ओळखणे. तसेच क्षमता वृध्दीची क्षेत्रे ओळखणे.
2. जॉर्डन साठी उपयुक्त ठरणा-या माहिती तंत्रज्ञान क्षमता वृध्दी कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी
3. गुंतवणूक आणि व्यापारवृध्दी क्षेत्रात उभय देशांदरम्यानच्या खाजगी आणि सार्वजनिक प्रकल्पांमध्ये सहकार्य
4. संस्थात्मक ढाचा तसेच नियामक धोरणांबाबत उत्कृष्ट प्रथांचे आदान-प्रदान.
N.Chitale/M.Desai