पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारत आणि टांझानिया यांच्या दरम्यानच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. भारतामध्ये प्रचलित असलेली पारंपारिक औषधोपचार पद्धती आणि टांझानियातील होमीओपॅथी उपचार पद्धती या क्षेत्रात सामंजस्य करार उभय देशांनी केला होता.
यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. संशोधन, प्रशिक्षण अभ्यासक्रम, परिषद, बैठक यासाठी आयुष मंत्रालयाला देण्यात आलेल्या निधीतूनच खर्च करण्यात येणार आहे.
S.Bedekar/B.Gokhale