पीएम्इंडिया
नेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. उभय देशामध्ये आज बांधकाम क्षेत्र तसेच शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. या करारांची यादी पुढीलप्रमाणे –
|
अ.क्र. |
कराराची माहिती |
नेपाळ |
भारत |
|
1. |
50 हजार घरकुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य भारताच्या वतीने पुरविण्यासंबंधी करार |
वित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी |
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर |
|
2. |
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील शिक्षण संस्थांची नव्याने उभारणी करण्यासाठी मदतीचा करार |
वित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी |
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर |
|
3. |
नेपाळचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुरातन वास्तूंच्या बांधकामाला सहाय्य |
वित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी |
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर |
|
4. |
भूकंपामुळे नेपाळमधल्या आरोग्य क्षेत्राची झालेली हानी भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्थांची उभारणी करण्यासाठी सहाय्य |
वित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी |
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर |
|
5. |
मेची सेतु आणि उभय देशांतील रस्ते वाहतूक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मदतीचा करार |
पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्रालय सचिव देवेंद्र कार्तिक |
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सचिव-युधवीर सिंग मलिक |
|
6. |
अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा करार |
गृहमंत्रालय सचिव- लोकदर्शन रेगमी |
महसूल मंत्रालय सचिव- हसमुख अढीया |
|
7. |
मूल्यांकनामध्ये समानता आणण्यासाठी प्रमाणिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार |
प्रमाणीकरण आणि मापन संस्थेचे, महासंचालक नेपाळ विश्वो बाबू पुदासेनी |
भारतीय प्रमाणीकरण संस्थेचे महासंचालक संजय सिंग |
|
8. |
भारत आणि नेपाळमधील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् यांच्यामध्ये सामंजस्य करार |
नेपाळ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटचे अध्यक्ष प्रकाश जे. थापा. |
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् चे अध्यक्ष निलेश एस. विकामसे |
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor