Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-बांग्लादेश सीमेवर व्यापारी पेठांच्या धर्तीवर हाट निर्मितीसाठीच्या सुधारित सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


भारत-बांग्लादेश सीमेवर व्यापारी पेठांच्या धर्तीवर सीमा हाट निर्मितीसाठीच्या आणि कार्य पध्दतीच्या सुधारित सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दोन्ही देशातल्या सीमेजवळच्या दुर्गम भागातल्या जनतेच्या भरभराटीसाठी, स्थानिक बाजारपेठेमार्फत, स्थानिक उत्पादनाला पारंपरिक खरेदी-विक्रीतून प्रोत्साहन देण्याचा यामागचा उद्देश आहे.

सध्या मेघालय आणि त्रिपुरा मध्ये प्रत्येकी दोन असे एकूण चार सीमा हाट सुरु आहेत.यामुळे समाजातल्या वंचित घटकांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा व्हायला मदत होणार आहे. सुधारित सामंजस्य करारामुळे आणखी सीमा हाट सुरु करायला कायदयाची चौकट लाभणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha