पीएम्इंडिया
भारत आणि स्लोव्हनिया यांच्या दुहेरी कर आकारणी टाळणाऱ्या तसेच आयकरासंदर्भात वित्तीय चुकवेगिरी रोखण्यासंदर्भातल्या करारात सुधारणा करणाऱ्या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली.
या सुधारणेमुळे उभय देशातल्या करविषयक माहितीच्या देवाण-घेवाणीची चौकट विस्तारणार आहे. याशिवाय उभय देशातल्या कर चुकवेगिरीला आणि कर टाळण्यालाही यामुळे आळा बसेल. कर संकलनासाठी परस्पर सहाय्याच्या दृष्टीनेही ही सुधारणा उपयुक्त ठरणार आहे.
N.Chitale/M.Desai