Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भूतानमधल्या जलविद्युत योजनेच्या सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


भूतानमधल्या 720 मेगावॅटच्या मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाच्या 4020.63 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाच्या अंदाजाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे.

मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भारत आणि भूतान यांच्यात एप्रिल 2010 मधे द्विपक्षीय करार झाला होता त्यासाठी 2896.3 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली होती. मात्र महामाईमुळे एकूण खर्चात 1124.359 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारत सरकारने प्रकल्‍प खर्चाच्या 30 टक्के रक्कम अनुदान म्हणून तर 70 टक्के रक्कम 30 वर्षांसाठी 10 टक्के व्याज दरानं दिली आहे.

N. Chitale / S.Tupe / M. Desai