Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्य प्रदेशात पिथमपूरमधल्या एन ए टी आर आय पी च्या ऑटो टेस्टिंग ट्रॅक ची अतिरिक्त जमीन परत करायला मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, मध्यप्रदेश सरकारला सुमारे 478.307 हेक्टर जमीन परत करायला मंजूरी देण्यात आली. यामध्ये सुमारे 461.607 हेक्टर खाजगी अधिग्रहीत तर 16.70 हेक्टर सरकारी जमिनीचा समावेश असून या जमिनीची किंमत सुमारे 740 कोटी रुपये आहे. एन ए टी आर आय पी अंतर्गत मध्यप्रदेश मध्ये इंदूरमधल्या पिथमपूर इथे ऑटो टेस्टिंग ट्रॅक साठी ही जमीन घेण्यात आली होती.

N.Chitle/S.Tupe/M.Desai