पीएम्इंडिया

मेमन मॅथ्यू, जैकब मॅथ्यू, जयंत जैकब मॅथ्यू, प्रकाश जावडेकर आणि डॉ. शशि थरूर, अतिथी गण, नमस्कारम,
मलयाला मनोरमा वृत्त परिषद -2019 ला संबोधित करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी केरळच्या पवित्र मातीला आणि त्यांच्या अनोख्या संस्कृतीला प्रणाम करतो. ही अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाची भूमी आहे जिने भारताला आदि शंकर, महात्मा आय्यनकली, श्री नारायण गुरु, छतंबी स्वामीगल पंडित करुप्पन, संत कुरियाकोस उर्फ छावरा, संत अल्फोन्सो आणि अन्य महान सुपुत्र आणि सुपुत्री दिले आहेत. केरळ माझ्यासाठी वैयक्तिकरित्या देखील खास आहे. मला केरळला भेट देण्याची अनेकदा संधी मिळाली. देशातील जनतेने माझ्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी सोपवल्यानंतर मी सर्वप्रथम गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला भेट दिली.
मित्रांनो ,
मलयाला मनोरमा वृत्त परिषदेतील माझ्या भाषणाने खूप उत्सुकता निर्माण केली आहे. साधारणपणे, असे मानले जाते की सार्वजनिक स्तरावर लोकप्रिय व्यक्तींचे प्राधान्य अशा व्यासपीठांवर जाण्याला असते जिथे त्यांचे विचार अन्य व्यक्तीच्या विचारांशी मिळतेजुळते असतील. कारण अशा प्रकारच्या लोकांमध्ये जाणे आरामदायी असते. मी देखील निश्चित पणे अशा वातावरणात जाण्याचा आनंद घेतो मात्र त्याचवेळी मला असे वाटते कि व्यक्ती आणि संघटनांमध्ये नियमित आणि निरंतर संवाद असायला हवा, मग ते कुठल्याही विचाराचे असोत.
प्रत्येक गोष्टीवर आपले एकमत होणे गरजेचे नाही मात्र विविध क्षेत्रांच्या सार्वजनिक जीवनात एकमेकांचे मत ऐकून घेण्याची पुरेशी शिष्टता असायला हवी. इथे मी अशा मंचावर आहे जिथे माझ्या विचारसरणीचे खूप कमी लोक असतील मात्र असे अनेकजण असतील ज्यांच्या विधायक टीकेचे स्वागत करायला मी उत्सुक आहे.
मित्रांनो ,
मला माहित आहे कि मलयाला मनोरमा एक शतकाहून अधिक काळ मल्याळी विचारांचा भाग राहिला आहे. त्यांनी आपल्या वार्तांकनाच्या माध्यमातून केरळच्या नागरिकांना अधिक जागरूक बनवले आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला समर्थन देण्यात महतवाची भूमिका पार पाडली आहे. अनेक युवकांनी विशेषतः स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुमचे इअरबुक नक्कीच वाचले असेल. त्यामुळे तुम्ही अनेक पिढ्यांमध्ये प्रसिद्ध आहात. या महान प्रवासात सहभागी झालेल्या सर्व संपादक, वार्ताहर आणि कर्मचाऱ्यांना मी अभिवादन करतो .
मित्रांनो,
या परिषदेच्या आयोजकांनी नवीन भारत ही अतिशय वेगळी संकल्पना निवडली आहे. टीकाकार तुम्हाला विचारतील- तुम्हीदेखील मोदींजींची भाषा बॊलायला लागलात ? मी आशा करतो कि तुम्ही त्यासाठी तुमचे उत्तर तयार ठेवले असेल. मात्र तुम्ही माझ्या अगदी जिव्हाळ्याची संकल्पना निवडली असल्यामुळे ही संधी साधून मी माझ्या मते नवभारताची भावना काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो.
मित्रांनो ,
मी नेहमीच म्हटले आहे – आपण पुढे जाऊ किंवा जाणार नाही, आपण बदल स्वीकारायला तयार असू किंवा नसू, मात्र भारत वेगाने बदलत आहे आणि हा बदल चांगल्यासाठी होत आहे. नवभारताच्या मर्मस्थानी अनेकांच्या आकांक्षा,सामूहिक प्रयत्न आणि राष्ट्रीय प्रगतीच्या स्वामित्वाची भावना आहे. नवा भारत सहभागात्मक लोकशाही. नागरिक-केंद्री सरकार आणि अति सक्रिय नागरिकांचा आहे. नवीन भारत उत्तरदायी जनता आणि उत्तरदायी सरकारचे युग आहे.
सन्माननीय अतिथि गण, गेली अनेक वर्ष एक अशी संस्कृति रुजत होती ज्यामध्ये आकांक्षा हा वाईट शब्द होता. दारे उघडणे तुमच्या संपर्कांवर अवलंवून होते. तुम्ही धन आणि सत्ता राखणाऱ्या गटाशी संबंधित आहात का यावर यश अवलंबून असायचे. मोठी शहरे, निवडक मोठ्या संस्था, आणि मोठी कुटुंबे- यालाच अर्थ असायचा. लाइसेंस राज आणि परमिट राज ची आर्थिक संस्कृति वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमध्ये अडकली. मात्र आज चांगल्या गोष्टींसाठी बदल घडत आहेत. चैतन्यदायी स्टार्ट-अप व्यवस्थेत नव्या भारताची भावना आपल्याला दिसते आहे. हजारो प्रतिभावंत युवक शानदार मंच तयार करत आहेत, उद्यमशीलतेची भावना दर्शवत आहेत. क्रीडा क्षेत्रातही आपल्याला हा उत्साह दिसून येत आहे.
भारत आता नवनव्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे, जिथे आपले अस्तित्व क्वचितच आढळायचे. मग ते स्टार्ट-अप असेल किंवा क्रीडा, या चैतन्याला कोण ऊर्जा पुरवत आहे? छोटी शहरे आणि गावे इथून आलेले ही साहसी युवा मंडळी आहेत ज्यांच्यबद्दल बहुतेकांनी ऐकलेच नसेल. त्यांचा प्रस्थापित कुटुंबांशी सम्बन्ध नाही, किंवा त्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम नाही. त्यांच्याकडे विपुल प्रमाणात समर्पण आणि आकांक्षा आहे. ते आपल्या आकांक्षेला उत्कृष्टतेत परिवर्तित करत आहेत आणि भारताचा गौरव वाढवत आहेत. माझ्यासाठी ही नवीन भारताची भावना आहे. हा असा भारत देश आहे जिथे युवकांच्या आडनावाला अजिबात महत्व नाही. आपले नाव कमवण्याच्या त्यांच्या क्षमतेला महत्व आहे. हा असा भारत आहे जिथे भ्रष्टाचार हा कधीही पर्याय असणार नाही, मग ती कुठलिही व्यक्ती असो. केवळ योग्यता हा एकच निकष असेल.
मित्रांनो ,
नवा भारत काही निवडक लोकांचा आवाज नाही. हा 130 कोटी भारतीयांपैकी प्रत्येकाचा आवाज आहे. आणि माध्यमांसाठी हा जनतेचा आवाज ऐकणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला देशासाठी काही ना काही योगदान देण्याची इच्छा असल्याचे आज आपण पाहतो. उदाहरणार्थ, अलिकडेच एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आहेत. ही केवळ नरेंद्र मोदीची कल्पना किंवा प्रयत्न नाही. भारताच्या जनतेने स्वतःहून गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त भारताला एकदा वापरण्यायोग्य प्लॅस्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. हा अनोखा काळ आहे आणि आपण आपल्या देशाचे परिवर्तन घडवणारी कोणतीही संधी आपण दवडता कामा नये.
मित्रांनो,
सरकार या नात्याने आम्ही भारताच्या विकासासाठी वैयक्तिक महत्वकांक्षा आणि सामूहिक प्रयत्न वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. जीवन सुखकर बनवणे असेल, महागाई नियंत्रणात ठेवणे असेल, पाच वर्षात 1.25 कोटी घरे बांधणे असेल, सर्व गावांचे विद्युतीकरण करणे असेल, प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरवठा करणे असे, आरोग्य आणि शिक्षण सुविधा सुधारणे असेल, या सर्वांचा उद्देश आपल्या युवकांसाठी योग्य वातावरण निर्माण करणे हा होता. या सरकारने केलेल्या कामाची व्याप्ती आणि प्रमाण आश्चर्यचकित करणारे आहे. आपण वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर शेवटच्या मैलांपर्यंत पोहचलो आहोत. 36 कोटी बँक कंठी उघडण्यात आली आहेत, छोट्या उद्योजकांना 20 कोटी कर्जे देण्यात आली आहेत, 8 कोटींपेक्षा अधिक गॅस जोडण्यांनी धूरविरहित स्वयंपाकघरे दिली आहेत, रस्ते बांधणीचा वेग दुपटीने वाढला आहे.
ही केवळ काही उदाहरणे आहेत. मात्र मला सर्वात जास्त आनंद देणारे आणि माझ्यामते नवीन भारताचे यश हे आहे कि भारतीय जनता कशा प्रकारे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजाचे हित पाहत आहे. नाहीतर काय कारण आहे गरीबातील गरीब व्यक्ती झिरो बॅलन्स खाते असूनही जनधन खात्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करत आहे ? आपल्या मध्यम वर्गाने त्यांचे गॅस अनुदान का सोडून दिले ? ज्येष्ठ नागरिकांनी एका विनंतीवर रेल्वे सवलत का सोडून दिली?
एका शतकापूर्वी गांधीजींनी विश्वस्त सिद्धांत स्वरूपात सांगितलेल्या गोष्टीची ही अभिव्यक्ती असू शकते. आज, भारताच्या परिवर्तनाकडे केवळ एक प्रेक्षक म्हणून न पाहता त्यात आपली भूमिका पार पाडण्याची तीव्र इच्छा देखील आहे. करदात्यांच्या संख्या वाढली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. लोकांनी ठरवले आहे की त्यांना भारताला पुढे घेऊन जायचे आहे.
मित्रांनो ,
तुम्ही असे बदल पाहणार आहात जे यापूर्वी पूर्णपणे अशक्य मानले जायचे. हरियाणा सारख्या राज्यात असा विचार देखील केला जाऊ शकत नाही कि सरकारी नोकऱ्यांमध्ये पारदर्शक पद्धतीने नियुक्ती केली जाऊ शकते. मात्र, हरियाणातील कोणत्याही गावात जा, तिथले लोक पारदर्शक पद्धतीने नियुक्त्या झाल्याबद्दल चर्चा करत असतात. आता रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवेचा वापर लोकांना करताना पाहणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे.
कुणी विचार केला असता कि एक दिवस हे वास्तवात उतरेल. पूर्वी प्लॅटफॉर्म सामान आणि प्रवाशांशी संबंधित मानले जायचे. मात्र आता, दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालय सुटल्यावर रेल्वे स्थानकात जातात , तिथल्या मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेतात आणि विकास साधतात. व्यवस्था तीच आहे, लोक तेच आहेत मात्र प्रत्यक्षात मोठे बदल होत आहेत.
मित्रांनो ,
भारतात लोकांची भावना कशी बदलली आहे ते केवळ दोन शब्दांचा वापर करून समजून घेता येईल. पाच वर्षांपूर्वी, लोक विचारायचे आपण करू शकतो का ?आपण अस्वच्छतेपासून मुक्त होऊ शकतो का ? धोरण लकवा आपण नष्ट करू शकतो का ? आज लोक म्हणत आहेत – आम्ही करू शकतो. आपण स्वच्छ भारत होऊ शकतो. आपण भ्रष्टाचारापासून मुक्त राष्ट्र होऊ शकतो. आपण सुशासनाला लोकचळवळ बनवूया. “करू” शब्द, जो यापूर्वी निराशावादी प्रश्नाचा द्योतक होता तो आता युवा देशाची आशावादी भावना दर्शवतो.
मित्रांनो ,
मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो, कशा प्रकारे आपले सरकार नवभारताच्या निर्मितीसाठी समग्रतेने काम करत आहे. तुम्हा सर्वाना माहित आहे आपल्या सरकारने गरीबांसाठी जलद गतीने 1.5 कोटी घरे बांधली आहेत. गेल्या सरकारच्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे. अनेक लोक मला विचारतात कि पूर्वीही योजना आणि निधी होते, मग तुम्ही वेगळे काय केले ? त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.
सर्वप्रथम आपण या तथ्याप्रती सतर्क होतो की आपण घरे तयार करत नाही तर घरे बांधत आहोत. अशा प्रकारे आपल्याला चार भिंती बांधण्याच्या संकल्पनेपासून दूर जाण्याची गरज होती.अधिक सुविधा देणे, अधिक मूल्य देणे, कमी वेळेत आणि अतिरिक्त खर्चाविना देणे हा आमचा दृष्टिकोन होता.
आमच्या सरकारने जी घरे बांधली त्यात आम्ही बांधकामाचा कठीण दृष्टिकोन नाही निवडला. आम्ही स्थानिक गरजा आणि लोकांच्या इच्छेनुसार घरे बांधली. सर्व मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही विविध सरकारी योजनांचा ताळमेळ साधला. जेणेकरून घरांमध्ये वीज, गॅस जोडणी, शौचालय आणि अशा अनेक आवश्यक सुविधा असतील.
अधिक मूल्य देण्यासाठी आम्ही लोकांच्या गरजा जाणून घेतल्या आणि केवळ घरांचे क्षेत्रफळ वाढवले नाही तर बांधकामाचा खर्चही वाढवला. या प्रक्रियेत आम्ही स्थानिक कारागीर आणि कामगारांना सामावून घेतले.कमी वेळेत आणि अतिरिक्त खर्चाशिवाय, घरे देण्यासाठी आम्ही या प्रक्रियेत तंत्रज्ञानाला एक महत्वपूर्ण घटक बनवले. विविध टप्प्यांवर बांधकामाची ऑनलाइन छायाचित्रे अपलोड करण्यात आली जेणेकरून प्रशासनाला स्पष्ट कल्पना येईल. निधीच्या थेट हस्तांतरणामुळे गळती रोखली गेली आणि पूर्ण समाधान मिळाले. आता जर तुम्ही मागे वळून पाहिले तर यापैकी एक अडचण जरी आली असती तर हे शक्य नव्हते. नुसते तंत्रज्ञान किंवा योजनांच्या ताळमेळाने या समस्या सोडवता आल्या नसत्या. तोडगा तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्व गोष्टी समग्र परिणाम देण्यासाठी एकत्र येतात. हे आमच्या सरकारचे वैशिष्ट्य आहे.
मित्रांनो ,
नवभारताच्या आमच्या कल्पनेत केवळ भारतातीलच नव्हे तर बाहेर राहणाऱ्यांची चिंता करण्याचा समावेश आहे. आपले अनिवासी भारतीय आपला अभिमान आहेत जे भारताच्या आर्थिक विकासात योगदान देत आहेत. जेव्हा एखाद्या अनिवासी भारतीयाला समस्या भेडसावते तेव्हा ती सोडवण्यासाठी आम्ही सर्वात पुढे असतो. पश्चिम एशियाच्या विविध भागात जेव्हा भारतीय परिचारिकांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांना परत मायदेशी पाठ्वण्यासाठी आम्ही कुठलीच कसर सोडली नाही. यापैकी बहुतांश परिचारिका दक्षिण भारतातील होत्या. हीच भावना केरळचे आणखी एक सुपुत्र फादर टॉम याना पकडण्यात आले तेव्हा दिसून आली. अनेक लोक येमेन मधून परत आले.
मी अनेक पश्चिम आशियाई देशांचा दौरा केला आहे आणि यामध्ये भारतीयांबरोबर वेळ व्यतीत करणे याला सर्वोच्च प्राधान्य आहे. मी नुकताच बहारिनच्या दौऱ्यावरून परत आलो आहे. बहारिन हा भारताचा महत्वाचा मित्र आहे . इथे अनेक भारतीय राहत असून अद्याप कुठल्याही पंतप्रधानांनी त्याला भेट दिली नव्हती. हा गौरव माझ्यासाठी शिल्लक होता . इथल्या राजघराण्याने सहानुभूतिपूर्ण निर्णय घेत तिथे शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीयांना माफी दिली. अशाच प्रकारची माफी ओमान आणि सौदी अरेबियाने दिली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला सौदी अरेबियाने भारताचा हज कोटा देखील वाढवला होता.
मित्रांनो, माझ्या संयुक्त अरब अमीरातच्या दौऱ्यात तिथे रूपे कार्डची सुरुवात करण्यात आली. आणि लवकरच बहारीनमध्येही लवकरच रूपे कार्ड असेल. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच, आखाती क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो लोकांना याचा लाभ होईल जे आपल्या घरी पैसे पाठवतात. आज मला हे सांगताना अभिमान वाटत आहे कि आखाती देशांबरोबर भारताचे सम्बन्ध पूर्वीपेक्षा अधिक चांगले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे.
मित्रांनो, आज माध्यमांमध्येही आपण नवभारताचा उत्साह पाहत आहोत. भारताची माध्यमे वैविध्यशाली आहेत. वृत्तपत्रे, मासिके, टीव्ही वाहिन्या, संकेतस्थळे यात सातत्याने वाढ होत आहे. अशा वेळी विविध अभियानांमध्ये माध्यमांनी पार पाडलेल्या सकारात्मक भूमिका मी अधोरेखित करू इच्छितो. मग ते स्वच्छ भारत अभियान असेल, एकवेळ वापरण्यायोग्य प्लास्टिक नष्ट करणे, जलसंवर्धन, तंदुरुस्त भारत आणि अन्य अभियान असतील.माध्यमांनी ही अभियाने आपली मानली आणि यासाठी लोकांना एकत्र आणले.
मित्रांनो, गेली अनेक वर्षे भाषा हे काळ आणि अंतराचा विचार करता लोकप्रिय विचारानिशी पुढे जाण्यासाठी एक सशक्त माध्यम राहिले आहे. भारत हा जगातील एकमेव देश असेल जिथे इतक्या भाषा आहेत. मात्र देशाचे विभाजन करण्यासाठी कृत्रिम भिंती उभारण्यासाठी काही स्वार्थी लोकांनी भाषेचा वापर केला. आज मी नम्रपणे सूचना करतो. भारताला एकजूट करण्यासाठी आपण भाषेच्या सामर्थ्याचा वापर करू शकत नाही का ?
माध्यमे विविध भाषा बोलणाऱ्या लोकांना जवळ आणण्यासाठी सेतूची भूमिका निभावू शकतो का ? हे दिसते तेवढे कठीण नाही. आपण देशभरात बोलल्या जाणाऱ्या 10-12 विविध भाषांमध्ये एक शब्द प्रकाशित करून याची साधारण सुरुवात करू शकतो. एका वर्षात एखादी व्यक्ती विविध भाषांमध्ये 300 पेक्षा अधिक नवीन शब्द शिकू शकते. एखाद्या व्यक्तीने दुसरी एखादी भारतीय भाषा शिकली तर त्याला त्यातील सामायिक धागे जाणवतात आणि भारतीय संस्कृतीच्या एकतेची खऱ्या अर्थाने प्रशंसा करतो. यातून अशा समूहांमध्ये वाढ होऊ शकते ज्यांना विविध भाषा शिकण्यात स्वारस्य आहे. कल्पना करा, हरियाणातील एक समूह मल्याळम भाषा आणि कर्नाटकातील एक समूह बंगाली भाषा शिकत आहे. पहिले पाऊल उचलल्यानंतर मोठी अंतर दूर होतील. आपण पहिले पाऊल उचलू शकतो का ?
मित्रानो,
या भूमीवर जन्मलेले महान संत, आपले पितामह ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, त्यांची मोठी स्वप्ने होती. 21 व्या शतकात आपले कर्तव्य आहे कि आपण ती पूर्ण करावीत आणि एका अशा भारताची निर्मिती करावी ज्याचा त्यांना अभिमान वाटेल.
मला खात्री आहे कि आपण हे साध्य करू शकतो आणि येणाऱ्या काळात एकत्रितपणे खूप काही करू शकतो.
पुन्हा एकदा, मलयाला मनोरमा समूहाला माझ्या शुभेच्छा आणि मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
धन्यवाद, खूप-खूप धन्यवाद.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
Kerala is also special for me, personally.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
I have had numerous opportunities to visit Kerala.
One of the first things I did after the people blessed me yet again with a big responsibility is visiting the Guruvayur Sri Krishna Temple: PM
Usually, it is believed that public figures prefer to be on forums whose thought process matches with the person’s own world view. Because there is a lot of comfort in being among such people: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Of course, I also cherish being among such surroundings but at the same time, I believe there must be a constant and continuous dialogue between individuals and organisations irrespective of one’s thought process: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
We need not have to agree on everything but there must be enough civility in public life for differing streams to be able to hear each other’s point of view: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
We need not have to agree on everything but there must be enough civility in public life for differing streams to be able to hear each other’s point of view: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Here I am, at a forum where perhaps I do not have many whose thought process is similar to mine but there are enough thinking people whose constructive criticism is something I greatly look forward to: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
For many years, a culture was perpetrated in which aspiration became a bad word.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Doors opened depending on your surname or contacts.
Success depended on whether you belonged to an Old Boy’s club.
Big cities, big institutions & big families…this is all that mattered: PM
The economic culture of License Raj and Permit Raj struck at the heart of individual ambitions.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
But, today things are changing for the better.
We see a spirit of New India in the vibrant start-up eco-system: PM
It is youngsters from small towns and villages. They do not belong to established families or have big bank balances.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
What they have is dedication and aspiration. They are converting that aspiration into excellence and making India proud.
This is the New India Spirit: PM
You would be seeing changes that were earlier deemed as impossible.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
In a state like Haryana, it was not thinkable that recruitment for government jobs could be done transparently.
But, now people are talking about the transparent manner in which recruitments took place: PM
How the spirit has changed in India can be summed up using just two words.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Five years ago, people would ask- will we?
Will we ever be free from dirt?
Will we ever remove policy paralysis?
Will we ever eliminate corruption?: PM
Today people say- we will!
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
We will be a Swachh Bharat.
We will be a nation free from corruption.
We will make good governance a mass movement.
The word ‘will’, which earlier denoted a pessimistic question now reflects the optimistic spirit of a youthful nation: PM
Our vision for New India includes not only caring for those living in the nation but also outside.
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Our diaspora is our pride, contributing to India’s economic growth.
Whenever any Indian overseas has faced a problem, we have been at the forefront of solving it: PM
Today, I have a humble suggestion. Can we not use the power of language to unite? Can media play the role of a bridge and bring people speaking different languages closer. This is not as difficult as it seems: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
We can simply start with publishing one word in 10-12 different languages spoken across the country. In a year, a person can learn over 300 new words in different languages: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Once a person learns another Indian language, he will come to know the commonality and truly appreciate the oneness in Indian culture. This can also give rise to groups of people interested to learn different languages: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019
Imagine a group in Haryana learning Malayalam and a group in Karnataka learning Bengali! All big distances were covered only after taking the first step, can we take the first step?: PM
— PMO India (@PMOIndia) August 30, 2019