पीएम्इंडिया
महामहीम पंतप्रधान दातो नजीब तून रझाज की,
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी
पंतप्रधान, तुमच्या स्नेहपूर्ण भावना आणि आदरातिथ्याबाबत धन्यवाद..
आसियान आणि पूर्व आशिया संमेलनामध्ये माझे स्वागत करण्याच्या तुमच्या कृतीने मी भारावून गेलो आहे.
आसियान समुदाय स्थापित करण्यासाठी आणि परिषदांच्या अत्त्युत्तम आयोजनाबाबत मी तुमचे अभिनंदन करतो. पूर्व आशिया परिषदेच्या दहाव्या वर्धापन दिनी तुम्ही घेतलेल्या आढाव्यामुळे या भागातल्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण व्यासपीठासाठी उत्तम मार्ग प्रस्थापित झाला आहे.
एकापाठोपाठ घडलेल्या दोन विमान दुर्घटनांमुळे कोणत्याही देशाचे नितीधैर्य खचले असते. मी तुमच्या नेतृत्वाचे आणि मलेशियन जनतेच्या आनंदी आणि प्रेरणामयी वृत्तीचे कौतुक करतो.
माननीय पंतप्रधान,
मलेशियाबरोबरच्या आमच्या संबंधांना आम्ही किती महत्त्व देतो, हे मला विषद करू द्या. आपल्यातील संबंध विकासाच्या स्थिर मार्गावर कायम ठेवण्यासाठी तुमच्या नेतृत्वाप्रती आम्ही आभारी आहोत.
आपल्या जोडल्या गेलेल्या इतिहासाचे अनेक पैलू आहेत. आपल्यात संस्कृती आणि धर्माचे अनेक प्राचीन दुवे आहेत. मलेशियन भारतीय समुदाय हा आपल्यामधील खूप खास आणि मजबूत आहे. काल संध्याकाळी मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.
विविधता आणि लोकशाही ही आमची व्याख्या आहे. आम्ही चैतन्यपूर्ण आर्थिक भागीदारी निर्माण केली आहे. आम्ही समान सागरी मार्गावर स्थित आहोत.
या प्रदेशाप्रती आमचा दृष्टीकोन समान आहे आणि प्रादेशिक व्यासपीठांवर आम्ही एकत्रित काम करतो.
म्हणूनच, अशा समृध्द मैत्री संबंधांमुळे, आमच्यातील परिषदा, मंत्रीस्तरावरील चर्चा आणि अधिकाऱ्यांच्या बैठका अधिक नियमित करण्याबाबत आमची सहमती झाली आहे, याबाबत मला आनंद होतो.
आमच्या भागीदारीची गती वाढवण्यासाठी आम्ही नव्या उत्साहाने कार्य करू, असा विश्वास मी तुम्हाला देतो.
आपल्यातील संरक्षण सहकार्याबाबत मी आपला विशेष आभारी आहे. आपल्या सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्याबाबत आपल्या समान वचनबध्दतेला मी अधोरेखित करतो. या क्षेत्रातील आपले सहकार्य आम्ही अधिक वृध्दींगत करू.
विविध देशांमध्ये नुकतेच झालेले हल्ले, विशेषत: भारत आणि अफगाणिस्तान विरुध्द सातत्याने होणारे दहशतवादी हल्ल्यांचे प्रयत्न, हे जागतिक पातळीवर उभ्या ठाकलेल्या दहशतवादाचे एक रुप आहे.
पंतप्रधान महोदय, आपण टोकाच्या मूलगामीत्वाशी लढा देण्यात, दहशतवाद आणि धर्म यांच्यातील कोणताही दुवा नाकारण्यात आणि इस्लामच्या खऱ्या तत्त्वांना अधोरेखित करण्यात आपण सामर्थ्यशाली नेतृत्व दिले आहे.
या आव्हानाविरुध्द आपल्या जागतिक प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण पैलू आहे.
आम्ही आमच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करू, ज्यात सागरी सुरक्षा वाढवणे आणि आपल्या भागातील अधिक मजबूत आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश असेल.
संयुक्त कवायतींचा दर्जा अधिक उंचावण्याबाबत आणि एसयू-30 परिषद स्थापन करण्याबाबत आमची सहमती झालीय, याबाबत मला आनंद वाटतो.
कवायतींचा दर्जा वाढवणे आणि प्रशिक्षण तसंच संरक्षण साहित्याबाबत सहकार्य वाढवणे याबाबत आम्ही अधिक कार्य करू.
सायबर सुरक्षेबाबत सहकार्य करण्याबाबतचा आमचा करार खूप महत्त्वपूर्ण आहे. आपले जीवन नेटवर्किंग ने अधिकाधिक जोडले जात असतांना, सध्याच्या काळातील हा सर्वात चिंतेचा विषय बनला आहे.
आमचे व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक उच्च पातळीवर जाऊ शकतात या पंतप्रधानांच्या मतांशी मी सहमत आहे. आमच्यातील द्विपक्षीय करार आणि भारत-आसियान करारांचे पूर्ण सामर्थ्य पडताळून पाहण्याचा आमचा निर्धार आहे.
क्षेत्रीय सर्वंकष आर्थिक सहकार्य कराराचा लवकरात लवकर निष्कर्ष निघावा याकडे आम्ही आशेने बघत आहोत.
पायाभूत सुविधांबाबत मलेशियाचे कौशल्य सर्वमान्य आहे. मलेशियाने भारतातील रस्ते प्रकल्पांसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले आहेत.
पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि त्यांचा विस्तार करणे, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये मलेशियाच्या गुणवत्तापूर्ण सहभागाबद्दल मी आमची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे.
मलेशियात भारतीय कंपन्यांचे मोठे अस्तित्व आहे. येथील रेल्वे पायाभूत सुविधा विकासात IRCON चा मोठा वाटा आहे. मलेशियाच्या अर्थव्यवस्थेत भारताच्या अस्तित्वाचा स्तर आम्हाला अधिक उंचावायचा आहे.
निश्चित आणि लवकर परिणाम दिसून येण्यासाठी उचलावी लागणारी पावले पडताळून पाहण्यासाठी पंतप्रधान आणि मी कटिबध्द आहोत. मी आज मलेशियातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
सार्वजनिक प्रशासन आणि नियमन क्षेत्रात आम्ही आमचे सहकार्य अधिक मजबूत करत आहोत याबद्दल मला आनंद वाटतो. मी कामगिरी व्यवस्थापन आणि डेलिव्हरी एकक अर्थात पीईएमएएनडीयू सोबत वैयक्तिकरित्या चर्चा केली आहे आणि आमचा निती आयोग त्यांच्या सोबत कार्य करणार असल्याचा मला आनंद होत आहे.
आम्ही लोकांमधील परस्पर संबंध आणि सांस्कृतिक दुव्यांवर विशेष भर देणार आहोत.
ब्रिक्सफिल्डमधल्या लिटल इंडियाच्या प्रवेशावरील तोरना गेटचे मी आणि पंतप्रधान नजीब उद्घाटन करणार आहोत, हे तुम्हाला माहितच आहे. ही भारताने दिलेली भेट आहे, पण हे पंतप्रधान नजीब यांच्या प्रेमाचेही प्रतिक आहे. तसेच आमच्यातील काळातीत संबंध आणि आमच्या लोकांमधील मैत्रीचेही हे प्रतिक आहे.
मलेशियातल्या विद्यार्थ्यांना आम्ही भारतात शिक्षणासाठी येण्याचे निमंत्रण देतो आणि पदव्यांची परस्पर मान्यता याबाबतच्या कराराला लवकरात लवकर मूर्त स्वरुप देण्याची इच्छा दर्शवतो.
आयुर्वेद आणि सिध्द औषधी यासारख्या पारंपारिक औषधांमधील आमच्या वाढत्या आणि उत्तम सहकार्यामुळे मी खूप आनंदित आहे.
पंतप्रधान महोदय, आपल्यातल्या फलदायी चर्चेबाबत मी आपले आभार मानतो. आपल्यातील धोरणात्मक सहकार्य नव्या उंचीवर जाईल, याविषयी मला विश्वास वाटतो. तुमच्या भविष्यातील भारत भेटीबाबत मी आशादायी आहे.
धन्यवाद..!
J. Patankar/S.Tupe/B. Gokhale
Appreciate your gesture of hosting me in the midst of the ASEAN and East Asia Summit: PM @narendramodi begins his remarks at the press meet
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
Commend the resolve and resilience of people of Malaysia. India's links with Malaysia are very old: PM https://t.co/w2eQhMtqCA
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
We will work with renewed vigour to raise momentum of our partnership. We will continue to deepen security cooperation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
We will make defence cooperation stronger. Our agreements on cyber security are very important: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
Our trade and investment relations can be scaled up significantly. Malaysia's competence in infrastructure is well known: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
We will play special emphasis on cultural and people to people ties: PM @narendramodi at the press meet. https://t.co/w2eQhMtqCA
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
Our strategic partnership will go to a new level. Looking forward to welcome PM @NajibRazak to India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2015
Discussed the many dimensions of India-Malaysia relations with PM @NajibRazak & spoke of ways to deepen ties. pic.twitter.com/WnemWfl7YI
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2015
Diversity & democracy connect India & Malaysia. We want to further expand cooperation in economy, trade & security. https://t.co/QAIvkPw8kV
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2015