Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महत्त्वाच्या बंदरांमधील कंटेनर टर्मिनल प्रकल्पांतील मेसर्स दुबई पोर्ट वर्ल्ड लिमिटेडच्या समभाग धारणेत प्रस्तावित बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची “ना-हरकत” मंजूरी


महत्त्वाच्या बंदरांमधील कंटेनर टर्मिनल प्रकल्पांतील मेसर्स दुबई पोर्ट वर्ल्ड लिमिटेडच्या समभाग धारणेत प्रस्तावित बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज “ना-हरकत” मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

ही कंपनी हिंदुस्थान पोर्टस्‌ प्रा. लिमिटेड या नावे भारतातील बंदरसंबंधी पायाभूत सुविधांचे स्वामित्व एकत्रित करण्यासाठी आपल्या मालमत्तेची फेररचना करीत आहे. सवलतीच्या करारानुसार नवी कंपनी जुन्या कंपनीची सर्व दायित्व अधिग्रहीत करणार आहे. समभाग बदलानंतर प्रकल्पातील कंपनीची गुंतवणूक 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक राहिल, या अटीवर सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

कंपनीच्या भारतातील मालमत्तेची फेररचना झाल्यामुळे भारतात नोंदणीकृत असलेल्या एकाच कंपनीशी व्यवहार करावा लागेल त्यामुळे बंदर प्राधिकरणासाठी समन्वय आणि नियंत्रणाचे काम सुलभ होईल. या निर्णयामुळे थेट परकीय गुंतवणूक तसेच बंदर क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील सहभागालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

M.Pange/S.Tupe/M.Desai