Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण आणि नगर विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण आणि नगर विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण आणि नगर विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण आणि नगर विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


महाराष्ट्रातल्या नगर‍ विकास वाहतूक आणि गृहनिर्माण क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचे आज कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी कल्याण येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांच्या हस्ते दोन मेट्रो मार्गिकांचा पायाभरणी समारंभ झाला. यात ठाणे-भिवंडी-कल्याण आणि दहिसर-मीरा-भाईंदर अशा दोन मेट्रो रेल्वे मार्गांचा समावेश असून या सुविधेमुळे कल्याण परिसरात वाहतुकीची उत्तम व्यवस्था निर्माण होईल.

कल्याण येथेच पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाच्या लोकांसाठी 90,000 घरांच्या मोहिमेचीही पायाभरणी केली. या प्रकल्पासाठी 33,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारने अत्यंत कमी कालावधीत पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक या क्षेत्रात अत्यंत वेगाने प्रगती केली आहे असे पंतप्रधान म्हणाले. ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुण्यातही पंतप्रधानांनी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या सोयी वाढवण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे असे त्यांनी सांगितले. पुढच्या पिढीला उत्तम पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकार रात्रंदिवस झटत आहे असे ते म्हणाले. ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘अटल संशोधन अभियान’ अशा योजनांमुळे भारत तंत्रज्ञानाचे केंद्र बनतो आहे असे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी काढले.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar